अकोला: पत्रकारिता क्षेत्रात संघटनात्मक व उल्लेखेनिय कार्याबद्दल बाळापूर तालुक्यातील पारस येथील नरेंद्र नवनीत इंगळे यांची ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड युवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांनी १९ फेब्रुवारी 2024 रोजी नियुक्तीपत्र देऊन संघटनेच्या प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर करण्यात आले.ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणींची यांना जान असून त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील अशी आशा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी व्यक्त केली पत्रकार नरेंद्र नवनीत इंगळे एन टीव्ही च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळून देण्या चे कार्य ते ५ वर्षां पासून करत आहेत. नरेंद्र नवनीत इंगळे यांना पत्रकार,समाजिक, राजकीय, शैक्षणिक, रुग्णसेवक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.युवा ग्रामीण पत्रकार संघ हा सर्वाधिक सभासद असलेले पत्रकार संघ आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक प्रगती सदैव कटिबंध असलेला संघ म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाने आपली ओळख निर्माण केली आहे.