Home महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचे विचार मानवी समाजाला प्रेरणादायी : डॉ. अमर कांबळे ॲड....

छत्रपती शिवरायांचे विचार मानवी समाजाला प्रेरणादायी : डॉ. अमर कांबळे ॲड. प्रकाश मोरे, हिंदुराव हुजरे-पाटील यांना छत्रपती शिवराय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

104

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांनी मानवी कल्याणाचे राज्य निर्माण केले होते. आपल्या राज्यातील सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार मानवी समाजाला नेहमी प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन डॉ. अमर कांबळे यांनी केले. ते राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेत बोलत होते.
तत्पूर्वी दुसऱ्या छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेचे उदघाटन शिवरायांच्या वेशभूषातील बालकलाकार आदित्य म्हमाने यांनी अंधारावर मात शिवाजी, एक नवी सुरुवात शिवाजी! या कवितेचे वाचन करून केले.
या परिषदेत मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा छत्रपती शिवराय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार अपरिचित छत्रपती शिवरायांचे अभ्यासक आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. प्रकाश मोरे, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव हुजरे-पाटील यांना मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयांची पुस्तके सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन ॲड. करुणा विमल आणि अनिता गायकवाड यांनी केले
या परिषदेत विचारवंत आणि पत्रकार ताज मुल्लाणी, कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने, सामाजिक कार्यकर्त्या निती उराडे आदी मान्यवरांनी प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडले.
सत्काराला उत्तर देताना हिंदुराव हुजरे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवराय डोक्यावर नको, तर डोक्यात घेणे गरजेचे आहे. यावेळी हिंदुराव हुजरे-पाटील यांनी सामाजिक कामासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली.
सत्काराला उत्तर देताना ॲड. प्रकाश मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सत्य विचार समजून घेतले पाहिजेत. ते समग्र मानव जातीचे आदर्श होते. त्यांनी मोठ्या संघर्षातून रयतेचे राज्य उभे केले.
यावेळी छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार देऊन जमाते-ए-इस्लामी हिंद या संघटनेसह विजयकुमार कांबळे, अमोल सावंत, विशाल घोडके, लक्ष्मण माळी, शंकर पुजारी, काळूराम लांडगे, चंद्रकांत घाटगे, संजय ससाणे, पृथ्वीराज नागवेकर यांचाही सन्मान करण्यात आला.
निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, बालसाहित्य कलामंच, सत्यशोधक प्रागतिक विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच या संस्थानी परिषदेचे आयोजक केले होते.
यावेळी ॲड. विवेकानंद घाटगे, सुरेश केसरकर, ॲड. अकबर मकानदार, ॲड. अतुल जाधव, ॲड. शैलजा चव्हाण, बाजीराव नाईक, ॲड. सचिन आवळे, किशोर खोबरे, डॉ. निकिता चांडक, लता पुजारी यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. शोभा चाळके यांनी केले, आभार डॉ. स्मिता गिरी यांनी मानले तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here