Home महाराष्ट्र टेंभुरखेडा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ! आमदार देवेंद्र भुयार...

टेंभुरखेडा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ! आमदार देवेंद्र भुयार यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश !

79

 

वरूड तालुका प्रतिनिधी !
वरूड तालुक्यात टेंभुरखेडा येथे विशेष बाबा म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
टेंभुरखेडा पंचक्रोशीतील गव्हाणकुंड,भेमडी लहान, भेमडी मोठी, झटामझीरी, पिंपळशेंडा, तिवसाघाट, या गावांसह इतर वाड्यावस्त्यांना या आरोग्य उपकेंद्राचा लाभ होणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
वरूड तालुक्यामधे ग्रामीण भागांमधे मध्यवर्ती व सोईचे ठिकाण असल्याच्या पार्श्वभुमिवर टेंभुरखेडा येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी देवून परिसरातील नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून
देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे रेटून धरली होती.
वरूड तालुक्यातील टेंभुरखेडा गव्हाणकुंड, भेमडी लहान, भेमडी मोठी, झटामझीरी, पिंपळशेंडा, तिवसाघाट, यासह आदी गावातील लोकांना लसीकरण करण्यासाठी व गर्भवती महिलांना नोंदणी व उपचार करण्यासाठी मलकापूर येथे जावे लागत होते परंतु टेंभूरखेदा गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बाब आमदार देवेंद्र भुयार यांच्या लक्षात आणून दिली होती. याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी शासानकडे सतत पाठपुरावा करून नियमानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यासाठी ३५ हजार लोकसंख्या असणे गरजेचे आहे ही बाब नियमबाह्य आहे असे लक्षात आल्यानंतरही आमदार देवेंद्र भुयार यांनी हार न मानता ४ वर्ष सतत यशस्वी पाठपुरावा करून शासनाकडून टेंभूरखेडा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र विशेष बाब म्हणून मान्यता प्राप्त करून घेतली तेव्हा आमदार देवेंद्र भुयार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत टेंभुरखेडा पंचक्रोशीतील गव्हाणकुंड,भेमडी लहान,भेमडी मोठी, झटामझीरी, पिंपळशेंडा, तिवसाघाट, या गावांसह इतर वाड्यावस्त्यांतील गावकऱ्यांना नागरिकांना दिलेला शब्द आमदार देवेंद्र भुयार यांनी पाळल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here