Home महाराष्ट्र हळदी-कुंकू कार्यक्रमातून विचारांचा जागर व्हावा‎ — डॉ मोनाली भुयार मोर्शी येथे...

हळदी-कुंकू कार्यक्रमातून विचारांचा जागर व्हावा‎ — डॉ मोनाली भुयार मोर्शी येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !

92

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी : आमदार देवेंद्र भुयार यांच्या कुटुंबियांतर्फे मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिम्मत्य मोर्शी शहरामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार देवेंद्र भुयार यांच्या पत्नी डॉ मोनाली भुयार यांच्या हस्ते पार पडले.
संस्कृतीचा वारसा महिलांमुळे‎ जपला जात आहे. हळदी-कुंकू‎ कार्यक्रमात एकत्र येताना, महिलांनी‎ विचारांचा जागर करणे आवश्यक‎ आहे. एकमेकींचे सुख, दु:ख जाणून‎ घेताना, समाजात स्त्रियांच्या‎ प्रश्‍नावर विचार मंथन होऊन ते‎ सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत,‎ असे आवाहन डॉ मोनाली देवेंद्र भुयार यांनी‎ केले.‎
आमदार देवेंद्र भुयार यांच्या कुटुंबीयांच्या‎ वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात‎ महाराष्ट्राची लोकपरंपरा व‎ संस्कृतीचा जागर करण्यात आला.‎ मराठमोळ्या वेशभूषेत या‎ कार्यक्रमात सहभागी होऊन‎ महिलांनी कार्यक्रमाचा आनंद‎ लुटला. महिलांचे यावेळी रंगलेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विविध सांस्कृतिक कार्यक्रम व‎ विविध स्पर्धेतून आपल्या‎ कल्पकतेचा अविष्कार घडविला.‎ एकमेकींना हळदी-कुंकू लावून‎ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मकरसंक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख उत्सव असून यानिमित्ताने सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन गावागावात परस्पर स्नेहबंधातून सामाजिक सलोखा वृध्दिंगत करण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. आपण सर्व एकसंघ, सुसंस्कृत आणि सशक्त असलो की आपला वैयक्तिक आणि सामाजिक विकास शिघ्रतेने होण्यास मदत होते. त्यामुळे आपला संसार सुखाचा करून सामाजिक सुखासाठी झटण्याचा प्रयत्न प्रत्येकांनी करायला हवा असे मत डॉ मोनाली भुयार यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी महिलांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तर उपस्थित सर्व महिला भगीणींना आकर्षक वाण भेट देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मेघना मडघे, माजी नगरसेविका विद्या ढवळे, माजी नगर सेविका क्रांती चौधरी, पाळा येथील उपसरपंच प्रीती जिचकार, निर्मला भुयार, डॉ मोनाली भुयार, योजना अमदरे यांच्यासह अनेक मान्यवर महिला मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here