Home महाराष्ट्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या माकडासह गौ – मातेवर उपचार

अपघातात गंभीर जखमी झालेल्या माकडासह गौ – मातेवर उपचार

136

 

खामगांव :- येथील शेगांव रोड वरखेड फाट्या समोर दिनांक 12 तारखेला एका माकडाला मध्य रात्री पहाटे अज्ञात वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले ते माकड जखमी अवस्थेत रस्त्या लगत राधास्वामी सत्संगच्या बाजूला एका पडीत शेतात घासत घासत तडफडत गेले. घटनेची माहिती दिनांक 13 ला सकाळी 8 वाजता मिळताच एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, प्रदीप शमी, गुरमुख गुरबानी हे लगेच पोहचले वनविभाग अधिकारी भास्कर डाबेराव यांना फोन द्वारे माहिती दिली तसेच डॉक्टर कडून उपचार करून घेत वन कर्मचारी सुरेश तायडे, मिलिंद इंगळे स्वाधीन दिले परंतु ते माकड दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता गतप्राण झाले. दिनांक 13 रोजी सायंकाळी 5 वाजता बर्डेप्लॉट कमानी समोर चौफुल्ली वर एका अज्ञात वाहनाने बेवारस दोन जिवाच्या गौ – मातेला धडक दिली गौ – माता रोडवर रक्तबंबाळ होऊन तडफडत होती कोणी मदत करायला तयार नव्हता मग राम अहीर यांनी घटनेची माहिती एकनिष्ठा गौ – सेवक सुरजभैय्या यादव, सागर बेटवाल यांना देताच त्यांनी आपले सहकारी अभिषेक देशमुख, सौरभ पाटील, गजानन इंगळे, विर यादव, संतोष उकर्डे, मुळीक, घोगरे, जगन कोंडे, दिलीप गावंडे, विशाल यादव यांना सोबत घेऊन गौ – मातेला उचलून बैलगाडी वर टाकून राम अहीर यांच्या घरासमोर नेऊन डॉक्टर निवृत्ती क्षिरसागर यांना बोलावून उपचार केले परंतु गौ – माता दोन जिवाची असल्यामुळे तिच्या समोरच्या पाय पूर्णपणे निकामी झाल्याने तो पाय तुटला व हाडाचे दोन तुकडे झाले आणि पोटावर जबर मार लागल्याने ती गौ रक्तबंबाळ झाली तिचा बाळ पोटामध्ये मरण पावल्याने गौ – मातेची तब्येत चिंता जनक झाली होती 2 तासा नंतर ती गौ मृतमुखी पडली एकनिष्ठा गौ – सेवा फाउंडेशन कडून जेसीबी बोलावून मोठा खड्डा करून रात्री 10 वाजता अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली या सेवेसाठी लागणारा खर्च एकनिष्ठा गौ – सेवा फाउंडेशन कडून करण्यात आला अशी माहिती राम अहीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here