Home महाराष्ट्र डोंगरयावली घोडदेव परिसराला गारपीट अवकाळी पावसाने झोडपले ! गारपिटीमुळे आंबिया बहराच्या...

डोंगरयावली घोडदेव परिसराला गारपीट अवकाळी पावसाने झोडपले ! गारपिटीमुळे आंबिया बहराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे नुकसान !

119

 

मोर्शी / तालुका प्रतिनिधी
मोर्शी तालुक्यातील विविध परिसरात दिनांक १५ फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या गरपीट व अवकाळी पावसामुळे घोदडेव, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा यासह विविध परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आंबिया व मृग बहाराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे चांगलेच नुकसान झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे .
आधीच मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असतांना त्या संकटातून सावरण्याच्या प्रयत्नात असतांना आता पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या गारपीटीमुळे मृग व आंबिया बहराच्या संत्राचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे .
आधीच मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा विवीध रोगांमुळे सुकन्याच्या मार्गावर असतांना शेतकऱ्यांना उपाय योजना करण्यासाठी वन वन भटकावे लागत असूनशेतकरी संत्रा बाग वचविन्याच्या प्रयत्नात असतांना शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून शेतकरी करो या मरो च्या परिस्थितीत असतांना आता पुन्हा झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे आंबिया मृग बहाराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटांची मालिक सुरु आहे .
आधीच संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असतांना शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले आहे. परिसरात गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेल्या भागातील संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे झाडाला लागलेल्या संत्र्यांचा सडाच खाली पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. झाडाला असलेल्या फळालाही मार लागल्यानं या मालाला भावही चांगला मिळणार नसल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. वर्षभराचं पीक हातचं गेल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here