Home चंद्रपूर रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटना स्थापित

रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटना स्थापित

87

 

चंद्रपुर: शहरातील एकमेव रामाला तलावाचे वाढत्या अतिक्रमणा पासुन संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रशासनाला मागणी करण्यासाठी रामाला तलाव संरक्षण संघटना स्थापित करण्यात आली असून या साठी श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभागृहात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या ऐतिहासिक तलावाचे संरक्षण झाले नाही तर हा तलाव ही लवकरच इतिहासजमा होईल, म्हणून नागरिकांनी या तलावाच्या संरक्षणासाठी एकजूट होऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी करावी असे आवाहन करण्यात आले.
रामाला तलावाचे संरक्षण करण्यासाठी या संघटनेने एक निवेदन चंद्रपुर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालिवाल यांना देऊन योग्य नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे अशी माहिती संयोजक प्रा डा योगेश दुधपचारे यांनी दिली.
आता जिल्हाधिकारी महोदयांना रामाला तलावाचे वाढत्या अतिक्रमणा पासुन संरक्षण करण्यासाठी त्वरित प्रशासकिय निर्णय घेउन त्वरित संरक्षणाचे काम प्रारंभ करण्यासाठी निवेदन देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
श्री मनोज जूनोनकर यांनी जलस्त्रोतांवर अतिक्रमणाबाबत
न्यायालयीन निर्णय आणि सोलाव्या भारतीय लोकसभेच्या जलव्यवस्थापन स्ट्यांडिंग कमेटीच्या निर्णयांची माहिती सभेला दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जलस्त्रोतांना जिल्हा प्रशासनाने संरक्षित करून प्रदूषण मूक्त करावे अशी मागणी करण्याचे या सभेत ठरले.
चंद्रपूर शहरात पूर्वी गौरी तलाव, कोनेरी तलाव, घुटकाला तलाव, लेंढी तलाव, लाल तलाव हे पांच तलाव अस्तित्वात होते पण प्रशासकिय अधिकारी आणि जनतेने दुर्लक्ष केल्याने ह्या सर्व तलावांवर आतिक्रमण होऊन सर्व तलाव नष्ट करण्यात आले. आता एकमात्र रामाला तलाव शिल्लक आहे. त्याच्यावर ही 42 टक्के अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण अत्यंत तिव्रगतीने होत आहे, हे अतिक्रमण थांबले नाही तर चंद्रपूर शहराचे हे महत्वपूर्ण जलस्त्रोत नष्ट होईल.
तलाव संरक्षणाचे कार्य प्रशासनाने गंभीरतेने घेतले नाही तर मोठे जन आंदोलन करण्याचे या सभेत ठरले.
आभार प्रदर्शन वर्धा, इरई – झरपट नदी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक मुरलीमनोहर व्यास यांनी केले.
प्रा डा जुगलकिशोर सोमाणी, माजी नगर सेवक पप्पु देशमुख, अड राजेश विराणी आदिंनी विचार मांडले.
या प्रसंगी सी ए दामोदर सारडा, मुकुंद गांधी, दिनेश बजाज, मदनगोपाल पांडीया, कुणाल देवगिरिकर, अड योगेश पचारे,दामोदर मंत्री, श्यामलाल बजाज, शैलेश बागला, पंकज शर्मा, दीपक सोमाणी, सुधीर बजाज, चुडामण पिपरीकर, नितिन रामटेके, संदीप बजाज,श्री पतरंगे, अड योगिता रायपूरे आदिंसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here