पुणे: नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी,पुणे-३९ वतीने “अभ्यासाची तयारी” “स्मरणशक्ती दहा पटीने वाढवा” या विषयी दोन तासांची मोफत मार्गदर्शन कार्यशाळा रिध्दी सिध्दी गार्डन,राजगुरुनगर,खेड येथे उत्साहात संपन्न झाला.
खेड तालुक्यातील अनेक शाळांमधील पालक व विद्यार्थी वर्गाने वर्गाने सहभाग नोंदवला.यावेळी महाराष्टगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डाॅ.बी.जी.पाटील यावेळी म्हणाले की,”नुसता रट्टामारुन अभ्यास होत नसतो.आपल्याला पाठतंर करून लक्षात नाही,पाढे पाठकरून लक्षात ठेवता येत नाही.कितीही अभ्यासाची तयारी केली तरी अभ्यासाची लक्षात राहत नाही.अशावेळी विविध ब्रेनच्या टेकनीक्स,अभ्यासाच्या तयारीच्या विविध सोप्या पध्दती आणि विविध सोप्या पध्दतीने पाच मिनिटात सर्व पाढे बनविण्याची माहिती यावेळी विद्यार्थांना देण्यात आली.याचा मुलांच्या बुध्दीमतेमध्ये नक्कीच वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.”
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा नक्षञाचं देणं काव्यमंचवतीने बुक व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते डाॅ.बी.जी.पाटील,प्रा.सौरभ विद्याधर,प्रा.राजेंद्र सोनवणे,राकेश जगताप,सांडभोर,गिरीशसर,
सुधीर सर,गणेश गाडे,सावंत मॅडम,सौ.प्रीती सोनवणे,साईराजे सोनवणे,सौ.अनिता बिराजदार यांनी संयोजनात पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन नक्षञाचं देणं काव्यमंच वतीने करण्यात आले होते.