पुणे – भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी कडून पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचे उद्घाटन पर्यटन संचालनालयाच्या डेप्यूटी डायरेक्टर शमा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवचैतन्य हास्य क्लब चे श्री मकरंद टिल्लू, गिरीकंद ट्रॅव्हल चे संचालक अखिलेश जोशी, जॉय अँड क्रू चे संचालक अधिराज , थॉमस कुक चे श्रेयस कर्पे, आयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सीईओ शिरीन वास्तानी आदी मान्यवर उपस्थित होते.
दर वर्षीप्रमाणे भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी कडून पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल चे आयोजन केले जाते. आत्ता पर्यंत झालेल्या तिन्ही प्रदर्शनाला पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला तसा या चौथ्या प्रदर्शनाला ही मिळेल असे आयोजकाकडून सांगण्यात आले होते.
तीन दिवसाच्या प्रदर्शना दरम्यान एव्हरेस्टवीर तथा गिरिप्रेमी चे श्री उमेश झिरपे तसेच डॉ. सतीलाल पाटील यांनी त्यांचे पुणे ते सिंगापूर आणि परतीच्या बाईक प्रवासाचा अनुभव आणि सध्याच्या जीवनशैलीत पर्यटन कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले, तसेच अनेक पर्यंटन स्थळा विषयी तज्ज्ञ मंडळीनंकडून मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल मध्ये विविध देश विदेशातील सहलींचे पर्याय आणि आकर्षक लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील नामांकित ट्रॅव्हेल कंपन्या आणि त्यांचे विविध पर्याय या वेळी उपलब्ध करून दिले. या प्रदर्शनास पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. या पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल मध्ये ट्रॅव्हल कंपन्यांच्या 50 पेक्षा जास्त स्टॉल्सने सहभाग घेतला होता.तसेच विविध स्टॉलला पुणेकरांनी भेट देऊन ट्रॅव्हल कंपनीचे सुट्टीतील पुढील टूर साठी बुकिंग ही करण्यात आले.
हे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी चे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, सचिव सुरेंद्र कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.