Home यवतमाळ पुसद येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे रमाई जयंती निमित्ताने विविध सामाजिक व...

पुसद येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे रमाई जयंती निमित्ताने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन

100

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

पुसद (दि. 4 फेब्रुवारी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुसद येथे त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी दिली.

माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी बळ दिले संघर्ष केला माता रमाईचा त्याग लक्षात घेऊन पुसद येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्या राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापक छाया ताई भवरे, हंबर्डे ह्या राहणार आहेत. सकाळी सात वाजता माता रमाई यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून व बुद्ध वंदना घेऊ कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल, त्यानंतर नऊ वाजता रक्तदान शिबिर घेण्यात येईल, सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माननीय सचिन माळी व शीतल साठे पुणे यांचा बुद्ध भीम रमाई गीतांचा आंबेडकरी प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल, या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार व रमाईच्या गुणवंत लेकि चा सन्मान करण्यात येईल.

प्रमुख मार्गदर्शक पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे असतील, कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हा निरीक्षक मोहन राठोड, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष शामराव राठोड, जिल्हा संघटक विजय लहाने, तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, महिला तालुकाध्यक्ष विद्याताई नरवाडे ,तालुका महासचिव सुनंदाताई धबाले, शहर संघटक दीपाताई हराळ, शहर महासचिव निर्मलाताई सोनोने, डॉ.रजनीताई गायकवाड, मुख्याध्यापिका ललिता विठ्ठल खडसे, कुसुम विजय उबाळे, बदामीबाई डांगोरिया, लोकसंचलित साधन केंद्राच्या अश्विनी पुनवटकर, उज्वला बाबर, रजिया बी जानूला शहा, शीलाताई मस्के,आशाताई धोंगडे हे राहतील या पत्रकार परिषदेत बोलताना प्राध्यापक छायाताई भवरे हंबर्डे म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकार पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सन्मानित केले आहे म्हणून पत्रकारांनी वंचितांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमा ची भूमिका प्राध्यापक महेश हंबर्डे यांनी सांगितली, सूत्रसंचालन प्राध्यापक अंबादास वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे, महासचिव डॉक्टर अरुण राऊत, संघटक मधुकर सोनवणे, तालुका उपाध्यक्ष गजानन बागल, तालुका महासचिव उत्तमराव मस्के, राहुल धुळे ,प्रणव भागवत, भास्कर बनसोडे ,संदीप कांबळे, ओमप्रकाश कांबळे, विश्वास सावळे, यांनी पत्रकार परिषदेचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

या पत्रकार परिषदेस पुसद शहरातील तसेच तालुक्यातील सर्वच नामांकित वृत्तपत्रे तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते. आभार प्रदर्शन अध्यक्ष महिला आघाडी विद्याताई नरवाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here