*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड: विधानसभेत दहा वर्षे आक्रमक भूमिका घेऊन जिहे कठा पूर उपसा सिंचन योजना व उरमोडी धरणास मंजुरी घेऊन माणला लागलेला दुष्काळी कलंक पुसून काढणाऱ्या माजी आमदार (कै.) धॉडिएम वाघमारे यांचे स्मारक माण तालुक्यातील नवीन पिढीला ऊर्जा, प्रेरणा देईल, असे उद्गार आमदार गणेश नाईक यांनी काढले
वाशी येथील मराठा भवनात माजी आमदार (कै.) धोंडिराम वाघमारे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या
स्मारकाच्या प्रतिकृतींचे अनावरण नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी निर्मला वाघमारे, श्याम महाडिक, युवा नेते वैभव नाईक, विक्रम शिदे , प्रकाश मोरे, केशव म्हात्रे, विशाल डोळस, शिल्पा मोरे, पुरुषोत्तम भेोईर, विजय वाटुंज, समाजसेवक बिरुचाई मुंदडा आदी उपस्थित होते,
श्री. नाईक म्हणाले, “धोंडिराम वाघमारे १९९० ते २००० या कालावधीत माण-फलटण विधानसभा मतदारसंतघाचे प्रतिनिधित्व करत होते. वाघमारे यांनी त्यांच्या हुंदका काव्यसंग्रहात दुष्काळी माण
तालुक्याच्या व्यथा परखडपणे मांडल्या आहेत. उरमोडी जिहे कठापुर योजना मंजूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. वडजल या त्यांच्या गावी त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.”
अभय धोंडिराम आघमारे म्हणाले, “(कै.) वाघमारे यांनी केवळ मताच राजकारण न करता समाजकारण करून माझ्या दुष्काळी माण तालुक्याला दुष्काळमुक्त करावयाचा विडा उचलला होता.” कार्यक्रमास शेखर मोरे, अजय मोरे, संतोष कळमकर, रूपाली कळमकर,
आज वाशी (नवी मुंबई) धोंडीराम वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीच्या अनावरणप्रसंगी गणेश नाईक, निर्मला वाघमारे, श्याम महाडिक, वैभव नाईक, विक्रम शिंदे, प्रकाश मोरे, केशव म्हात्रे आदी.
सोनाली वाघमारे, क्रांती वाघमारे, शामल वाघमारे आदी उपस्थित होते. अभय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. संतोष कळमकर यांनी आभार मानले.