*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : भारताचा राज्यकारभार हा संविधानावरती चालतो, परंतु बहुतांश लोक संविधानापासून दूर राहतात. संविधानापासून अज्ञानी असल्यामुळेच अन्याय सहन करतात आणि हक्काची जाणीव होत नाही, त्यामुळे प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे. कारण संविधान वाचनातूनच माणसाला अन्याय विरुद्ध चीड आणि हक्काची जाणीव करून देणारी शिक्षण मिळते असे मत घर तिथं संविधान चे प्रमुख विश्वास मोहिते यांनी केले आहे.
आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान, आमचा मुलक समाज निर्मिती संस्था जिजामाता नगर वारुंजी यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त घर तिथं संविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधानाबद्दल माहिती देताना ते बोलत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित घर तिथं संविधान उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी सैनिक रविंद्र शामराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर शालेय विध्यार्थी भाग्येश धाबुगडे याने संविधान उद्देशीकेचे वाचन केले.
यावेळी बोलताना विश्वास मोहिते म्हणाले, खऱ्या अर्थाने समता मुलक समाज निर्मिती ही संकल्पना अमलात येण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, चळवळीतीत कार्यकर्ते, युवा वर्ग आणि विध्यार्थी यांनी संविधान वाचन करून त्याचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि समता मुलक समाज निर्मिती होण्यासाठी स्वतःपासून बदल करणे गरजेचे आहे असे सांगून विश्वास मोहिते यांनी संविधानातील समतेचे विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विचार तसेच अस्पृश्यता नष्ट करण्याबाबतचे विचार विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज कांबळे म्हणाले, विश्वास मोहिते सारखा सर्वसामान्य कुटुंबातील युवक घर तिथं संविधान ही संकल्पना राबवितो एवढेच नव्हे तर राज्यातील 500 गावात ही संकल्पना घेऊन जाण्याचा संकल्प करतो ही कराड-पाटण तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून या घर तिथं संविधान या उपक्रमास सर्वांनी पाठबळ देणे गरजेचे आहे असे सांगून कांबळे म्हणाले, आजची पिढी जागरूक होऊन संविधानाचे महत्व पटवून दिले तरच उद्याची पिढी संविधान साक्षर होण्यास मदत होईल. यावेळी स्वागत व प्रास्ताविक जावेद सुतार यांनी केले तर आभार आनंदा बडेकर यांनी मानले.
कार्यक्रमांस पाडळी (केसे ) ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर, भीम आर्मी सातारा जिल्हा संघटक अशोक मस्के, पत्रकार विध्या मोरे, युवराज कांबळे, संपत देवकर, सुरेखा शिंदे, रविंद्र पाटील, अर्चना पाटील, सचिन राठोड, निलेश साळुंखे, बंडा माळी, मोहन चोथे, निवास बेले, अतुल शेवाळे, संपतराव मोहिते, अनिल बडेकर,सह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.