बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114
बोअरवेल मशीनचे पाईपचे ३३ केव्ही लाईनच्या वीजवाहक तारांना घर्षण झाल्याने विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट येथे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत दोन्ही कामगार मूळ ओडीसा राज्यातील असल्याची माहिती आहे.
वाघबेट गावात बोअरवेल मशीन सहा कामगारांसह आणण्यात आले. बोअरवेलला पाणी लागल्यानंतर मशीन गावातून निघाली. मात्र, रस्त्यातील विजेच्या तारांसोबत मशीनवरील पाईपचा संपर्क झाला. त्यामुळे वीजेचा धक्का लागून मशीनवरील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. गोविंदा धवनसिंग आणि संदीप अशी मृतांची नावे आहेत. माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार रमेश तोटेवाड व व्यंकट डोरनाळे हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.