*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : गतिमान सरकार व मोदी सरकार म्हणून जाहिरात बाजी करणाऱ्या आपल्या देशामध्ये अनेक घटनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होते. तशीच नोंद आता भारतातील पाण्याविना साताऱ्यात एक पोलीस चौकी आहे. सातारा शहर पोलीस ठाणे अंतर्गत सातारा जिल्हाधिकारी कार्यालय, सदर बाजार, सातारा या ठिकाणी ही पोलीस चौकी असून त्याची नोंद व्हावी. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) सातारा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या या सातारा भूमी आहे . याच ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा नजीक ही पोलीस चौकी असून उद्घाघाटना पासून आतापर्यंत त्याठिकाणी पाण्याची जोडणी मिळाली नाही.या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाण्याविना कर्तव्य बजवावे लागत आहे. सातारा पंचायत समितीच्या आवारातील नळाद्वारे पाण्याची तहान भागवावी लागत आहे.
सातारा शहर पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील अनेक आंदोलन होतात. मोर्चे निघतात. उपोषण केले जाते .या वेळेला पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्यामुळे ऊन- वारा -पावसाची तमा न बाळगता अनेक पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असतात. त्यातूनच मग या ठिकाणी पोलीस चौकी उभी करावी. अशी मागणी पुढे आलेली होती .त्या अनुषंगाने सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अध्यक्ष अभियंता संतोष रोकडे यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी पोलीस चौकी बांधण्यात आली. त्याचे विलंबाने का होईना अधिकृत रित्या उद्घाघाटन दि २१ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा- ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळेला अनेक मान्यवर उपस्थित होते.
या गोष्टीला आता चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अद्यापही पाण्याची जोडणी न केल्यामुळे या पाण्याविना पोलीस चौकीला भेट देणाऱ्यांना पाणी देता का पाणी ? असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असता सदरचे पाण्याचे देयक कोणी द्यावे ? हा कळीचा मुद्दा असल्यामुळे तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पत्र पाठवून मागणी करावी. असे सांगण्यात आले. परंतु वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणतेही पत्र देता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणीपुरवठा करणारी जोडणी होऊ शकलेली नाही. गतिमान सरकार किती गतीने नकारात्मक विचार करीत आहेत. याची चुणूक दाखवली गेली आहे. अशी टीका होताना दिसून येत आहे.
सध्या महाराष्ट्रात गतिमान सरकार, मोदी सरकार अशी जाहिरात बाजी करून लोकांची दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या विभागाकडे आहे. त्या विभागाला जर पाणी मागण्यासाठी दाद मागावी लागत असेल तर कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे .दरम्यान, पाणीपुरवठा जोडणी न झाल्यास त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करावी. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) सातारा युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड, विजय कांबळे, लक्ष्मण पोळ, शमीम शेख, विजय यादव, अजय कांबळे प्रयत्न करणार आहेत व त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.