Home चंद्रपूर नोकरी म्हणजे अंतिम ध्येय नाही तर सुजाण नागरिक सुद्धा असणे काळाची गरज–...

नोकरी म्हणजे अंतिम ध्येय नाही तर सुजाण नागरिक सुद्धा असणे काळाची गरज– प्रकाश मेश्राम,अध्यक्ष-मूकनायक फाऊंडेशन

237

 

आदर्श विद्यार्थी समाजाला दिशा देऊन प्रेरणा निर्माण करू शकतात दि28/1/2024 ला चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर कार्यक्रम मध्ये बोलत होते विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्व आदी विषयावर मार्गदर्शन करीत होते ,सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे अधिक्षक श्री सुभाष शेशकर,तर मंचावर प्रमुख पाहुणे ,नेहरू महाविद्यालयाचे उपप्राचार्य निशिकांत शेरकुरेसर,प्रा दिवाकर कुंभरे सर प्रा dr मिल्मिले सर उपस्थित होते शेशकर सर यांनी आजचा विद्यार्थी हा उद्याचा दिपमान आहे हे विचार मांडले तर शेरकुरे सर यांनी निवडणूक प्रक्रिया व जाणकार मताधिकार व त्याचा वापर यावर प्रकाश टाकला
पुढे प्रमुख अतिथी प्रकाश मेश्राम यांनी ,,शब्द बदलले की वाक्य बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलतात आपण कसा वापर करतो व कशी निवड करतो हे आपल्यावर अवलंबून आहे ,कुंडीत लावलेलं रोपट नेहमी कुणी तरी पाणी घालेल याची वाट पाहत असते. तर जमिनीवर लावलेलं रोपट नेहमी मूळ खोलवर कसे जाईल आणि आपल अन्न स्वतः शोधत असते यापैकी कोणतं रोपट आपल्याला व्हायचं हे आपल्यावर अवलंबून आहे एनएसएस चे विद्यार्थी मध्ये झेप घेण्याची जिद्द असली पाहिजे याप्रमाणे प्रकाश मेश्राम अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन यांनी आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर आयोजित nss कॅम्प मध्येआपले विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचा लाभ शिबिरार्थी व ग्रामस्थ यांनी घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संबोधी गेडाम तर आभार रामटेके यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here