Home बीड जयराम तांड्यावर वाहाते विकासाची गंगा.! बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

जयराम तांड्यावर वाहाते विकासाची गंगा.! बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके साहेब यांच्याकडून विविध विकासकामांची पाहणी

140

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

जयराम तांड्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्याकरिता बीड जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके साहेब पंचायत समितीच्या बी.डि.ओ कांबळे मॅडम विस्तार अधिकारी उनवणे साहेब व पंचायत समितीची टीम यांनी काल दिनांक 27 /01/2024 शनिवार रोजी जयराम तांड्यातील विकास कामे पाहण्यासाठी दुपारी बारा वाजता अकस्मात भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषद शाळा आई भाया मंदिर, साई मंदिर, परिसर या ठिकाणी बसविलेले पेवर ब्लॉक जयराम तांडातील मुख्य रस्ता, जयराम तांडा पानद्रस्ता, नदिखोलिकरणाचे पुर्ण झालेले काम , तलावाचे चालु असलेले काम, तांड्यातील विद्युत रोहिञ पोलचे स्थानांतर कामांची पाहणी केली. व ही सर्व कामे गेवराई तालुक्यातील विकासाचे मॉडेल असल्याचे ग्रामस्थांसी चर्चा विनिमय करतांना नमुद केले, व नियोजीत ग्रामंपंचायत भवन बांधकाम जागेची पाहाणी करुण ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची पाहाणी केली. जयरामतांड्यातील सिमेंट रस्ते, पाणंद रस्ते, पेव्वर ब्लाॅक हि कामे विकासाचे मॅडेल असल्याचे नमुद केले. व जयरामतांड्यातील विकास कामांना प्रशासन स्तरावर गतीने काम करण्याच्या पंचायत समिती बी.डी.ओ.ना सुचना केल्या. व तांड्या प्रमाणे ईतर तांड्यात देखील अशी कामे व्हावीत अशी आपेक्षा व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here