Home राजकारण श्री. छ . खा.उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने राजकीय भूकंपाचा...

श्री. छ . खा.उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरू लागले कराड

153

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100*

म्हसवड : महाराष्ट्राचे वजनदार नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सुपुत्रांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त राज्यातील डझनभर मंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कराड – पाटणला आगमन झाले. या वेळेला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे राज्यसभेचे खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांच्या सोबत असूनही बाजूला जाऊन एकमेकांच्या कानात चर्चा केली. या चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू कराड ठरेल का? हे येणारा काळच ठरवेल.
पाटण येथे होणाऱ्या शाही सोहळ्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळासोबतच जिल्ह्याचे अनेक अधिकारी वर्ग तसेच शासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागलेली आहे. प्रोटोकॉल प्रमाणे शासकीय यंत्रणा अगदी अग्नीशमन दल, रुग्णवाहिका व इतर यंत्रणा या शाही सोहळ्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहेत. एखाद्या आनंद उत्सवाला साजेस अशी यंत्रणा कामाला लागलेली आहे. अशातच राजकीय घडामोडी घडल्यामुळे सर्वांच्या नजरा आता राजकीय नेत्यांकडे लागलेले आहेत. मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा युद्ध मनोज जरांगे – पाटील यांच्या हाती सुपूर्द केला. तेव्हापासून सुप्त का होईना ? ओ.बी.सी .समाज नाराज झालेला आहे .या समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण ,मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी फडणवीस यांना टार्गेट केल्यामुळे त्यांची बाजू घेण्यासाठी सातारच्या राजकारणातील छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला होता. एक वेळेला राजकीय नेत्यांवर मराठा क्रांती मोर्चा आगपाखड करत असताना दुसऱ्या बाजूला श्री जरांगे -पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्याच्या वेळेला या दोन्ही राजांची भेट घेऊन त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता. त्यानंतर नवी मुंबई येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळेला आमदार शशिकांत शिंदे यांनी चोख व्यवस्था केल्यामुळे त्यांचे कौतुक केले होते.
या सर्व घडामोडीमुळे ओ.बी.सी .मतदार हा मराठा समाजातील लोकप्रतिनिधी पासून दुरावला गेलेला आहे. हे आता अधोरेखित झालेले आहे .त्यामुळे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण, भाजपमधील ओ.बी.सी. नेते तसेच छगन भुजबळ , पंकजा मुंडे, राम शिंदे व इतरांना आता ओ.बी.सी. समाजामध्ये जाऊन भूमिका समजून सांगावी लागणार आहे.
अशा वेळेला होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत राजकारण सुरू झाले तर यासाठी काही अंश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेला बाजूला करून भाजप वेगळी चाचणी करत आहे. सातारा जिल्हा पालकमंत्री देसाई यांना बाजूला करून किंबहुना त्यांना काही ऐकू जाऊ नये. अशा पद्धतीने खासदार श्री छ उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली चर्चा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नेमकी चर्चा काय झाली ? हे जरी गुलदस्त्यात असले तरी पालकमंत्र्यांना बाजूला करून दोघांमध्ये झालेली पाच मिनिटाची चर्चा ही राजकीय भूकंपाची लक्षणे मानली जात आहेत. दरम्यान, राजकीय पक्षामधील आणखीन एक मासा गळाला लागण्याची सूचिन्ह दिसू लागलेली आहेत. अशी चर्चा सुरू झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here