*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल असे मत माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. ते गाव भेटीस येथे आले होते.
यावेळी भाळवणी गावचे सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते माझ्या जानकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील पाटील,दिलीप भानवसे,विजय शिंदे,सचिन भोसले,संदीप जाधव, प्रशांत माळवदे,निहाल शेख,भैय्या शिंगटे,उत्तम सराटे, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जानकर म्हणाले गावाच्या विकास कामांवर चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे.गावचा विकास रस्ते,पाणी वीज व स्वच्छता यावर अवलंबून असतो.गावाच्या विकास कामांकरिता मी निधी प्राप्त करून देणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.