✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड:- (दि. २७ जानेवारी) वनपरिक्षेत्र अंतर्गत होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मागील अनेक दिवसापासून वन विभागाकडे वारंवार तक्रारी करून चौकशीची मागणी केली असता त्यावर कोणतीही चौकशी न करता अधिकाऱ्याला वाचवण्याचे काम वरिष्ठ करत असल्याचा आरोप उमरखेड येथील जेष्ठ पत्रकार डॉ, आंबेजोगाईकर, पत्रकार विजय कदम, पत्रकार राजेश खंदारे यांनी केला आहे.
वनविभागाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.
चौकशी न झाल्यास २२ जानेवारी २०२४ पासून साखळी उपोषण करण्याचा व २५ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
तरीही कुंभकर्णी झोपत असलेल्या वनविभागाने कोणतीही चौकशी केली नाही.
आणि दि.२२ जानेवारी रोजी आयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण होते.
त्यामुळे उपोषण एक दिवस पुढे ढकलून २३ जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते.
पण २ दिवस झाले तरीही कोणत्याही अधिकाऱ्याने चौकशी करण्याचे आश्वासन दिले नसल्यामुळे दि.२५ जानेवारी पासून डॉ. आंबेजोगाईकर, विजय कदम, राजेश खंदारे, यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली ही गोष्ट भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक तथा यवतमाळ वाशिम लोकसभा प्रभारी नितीन भुतडा यांना कळताच त्यांनी त्वरित उपोषण मंडपाला भेट देऊन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांच्याशी संपर्क साधून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर ज्यूस घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण माघारी घेतले.
यावेळी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ, नायब तहसीलदार पवार साहेब,अतुल भाऊ खंदारे, पवन मेंढे, दुधेवार सर, बळवंतराव नाईक व अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.