धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ७४ वा प्रजासत्ताक वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग ९ वी परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी रूपाली दिपक कुवर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समारोहाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले.
यानंतर धरणगाव शहरात प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर शाळेचा माजी विद्यार्थी राहुल खैरनार हा भारतीय रेल्वेत रुजू झाल्यामुळे त्याचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व शिवजयंती चे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हा अनमोल ग्रंथ देऊन त्याचे अभिनंदन व कौतुक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. यानंतर उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी तंबाखू मुक्त भारत याची सामूहिक शपथ शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांसह घेतली.
या प्रजासत्ताक दिनी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी मुख्याध्यापक एम.के. महाजन, पी.के. रोकडे, मोतीलाल महाजन, सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन, दिपक कुवर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, माता-पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.