Home बीड बीडमध्ये दहा हजाराची लाच घेताना उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात

बीडमध्ये दहा हजाराची लाच घेताना उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात

145

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

तलावात गेलेल्या घराचा आणि जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी 10 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे असं लाचखोर महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा 5 लाख 38 हजार 965 रूपये एवढी नुकसान भरपाई मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतू, उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय 10 हजार रूपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने आज दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सागरे यांनीच वसूलीसाठी नेमलेला सेवा निवृत्त मंडळा अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here