Home चंद्रपूर नमो नवमतदार सम्‍मेलनात चंद्रपूरात भाजयुमोतर्फे हजारों युवकांनी सहभाग नोंदविला

नमो नवमतदार सम्‍मेलनात चंद्रपूरात भाजयुमोतर्फे हजारों युवकांनी सहभाग नोंदविला

99

 

 

चंद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व समाजासाठी निरनिराळे योजना राबविल्‍या व आजही राबवित आहेत. याच धर्तीवर युवकांनी देशाच्‍या प्रगतीसाठी योगदान देण्‍याच्‍या दृष्‍टीने नमो मतदार सम्‍मेलन देशात सर्व ठिकाणी आयोजित करण्‍याची योजना आखली. मुख्‍यतः पुढील २५ वर्षात देशाच्‍या सर्वांगिण प्रगतीसाठी युवकांनी स्‍वतःला झोकुन द्यावे, असे भा‍वनिक आवाहन मोदीजींनी या सम्‍मेलनाच्‍या उद्बोधन प्रसंगी केले. मेरा युवा भारत या योजनेला युवक व विद्यार्थी यांनी जुळावे असे आवाहन सुध्‍दा याप्रसंगी मोदीजींनी केले.

 

याच संकल्पनेतून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो नवमतदार संमेलन संपूर्ण देशामध्ये 5000 पेक्षा अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यात चंद्रपूर महानगर येथे जनता महाविद्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आला.

शेकडोच्या संख्येमध्ये नवमतदार विद्यार्थी व विद्यार्थिनी मोदीजींचे संबोधन ऐकण्यासाठी जमा झाले होते. कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, उपाध्यक्ष व सिनेट सदस्य यश बांगडे, देवानंद वाढई, प्रदीप किरमे, विनोद शेरकी, रवी लोणकर, रवी जोगी, गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, मनीष पिपरे, पप्पू बोपचे, संजय पटले, राहुल पाल, स्नेहीत लांजेवार, कुणाल गुंडावार, प्रवीण उरकुडे, प्रवीण गिलबिले, यश ठाकरे, मयूर चहारे, आकाश मस्के, अनुप शर्मा, ऐश्वर्य बांगडे, जयश्री आत्राम, महेश कोलावार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here