वरूड तालुका प्रतिनिधी /
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळाच्या वतीने जिवन आधार सामाजिक संस्था नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर बेनोडा (शहिद) येथे भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये बेनोडा जिल्हा परिषद सर्कलमधील हजारो रुग्णांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी केली असता या शिबिरातून २७३ रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून वरूड तालुक्यातील बेनोडा (शहीद) येथे महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळातर्फे नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मेडीसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, न्युरोलॉजि, शल्यचिकित्सक, कान, नाक, घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्युरो सर्जन), किडनी रोग तज्ञ, हृदयरोग यासह आदी आजारांची भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व आजारांची तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे बेनोडा ( शहीद ) जिल्हा परिषद सर्कलमधील हजारो रुग्णांनी या भव्य आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आरोग्य तपासणी केल्यामुळे त्यांना मोफत औषोपचार करण्यात आला असून २७३ रुग्णांना शास्त्रक्रिये करीता नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत. त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता भव्य आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया घेण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची मोफत तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणार्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया व पुढील उपचार नागपूर येथे करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.