Home महाराष्ट्र तापोळा भागातील सोमजाई काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा सुरू

तापोळा भागातील सोमजाई काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा सुरू

102

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड : कोयना धरणाच्या निर्मितीनंतर कोयना जलाशयामुळे जगप्रसिद्ध पावलेल्या तापोळा विभागातील आपटी, केळघर, फुरुस, हात्रेवाडी व निपाणीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सोमजाई काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा मोठ्या भक्ती भावाने व धूम धडाक्यात सुरू झालेली आहे.
या वार्षिक यात्रेसाठी पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या कुटुंब मित्र परिवारास आलेले आहेत. बुधवार, दि. २४ व गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी परी पद्धतीनुसार ही वार्षिक यात्रा संपन्न होत आहे.
दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता देवीची आरती सुरु होते. तदनंतर बुंडा जागराचे आयोजन केले जाते. यावेळी देवीचा गोंधळ घातला जातो. त्यानंतर आपटी गावात घरोघरी पालखी फिरविण्यात येते. रात्री ९ ते १० लेझीम पथकांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता कोल्हापूर येथील नामांकित आर्केस्टा धमाका हा कार्यक्रम होणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यानंतर रात्री १२ वाजता मोठ्या जल्लोषात छबिना काढण्यात येणार आहे. यात्रेसाठी गावी आलेले भाविक व यात्रेकरू पालख्यां आपल्या खांद्यावर घेऊन छबिना काढतात. रात्री १ वाजता बायना शारदा सातारकर यांचा मनोरंजनासाठी तमाशा होणार आहे.
गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तमाशाचा कार्यक्रम होईल. त्यांनंतर ३ ते ५ जंगी कुस्त्यांचे फड भरवण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थ मंडळ आपटी यांनी दिली. सदरची पालखी इतर गावातील भाविकांसाठीही घेऊन जाण्यात असते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व या भागातील सुपुत्र एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी आल्यामुळे बहुदा ते ही या ग्रामदैवताच्या दर्शनला येथील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here