धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर
धरणगाव — धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते नेताजी व बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उपशिक्षक लक्ष्मणराव पाटील यांनी नेताजी आणि बाळासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजींनी देशासाठी दिलेले बहुमोल योगदान व स्वातंत्र्योत्तर काळात मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष नव्या पिढीला कायम प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन पाटील सरांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित आणि जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे हे शिक्षकवर्ग तसेच शितल सोनवणे, वैशाली पाटील, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.