Home चंद्रपूर गावाच्या विकासासाठी ग्रामसभा बळकट करा – दिलीप गोडे ग्रामसभा धामणगाव चक च्या...

गावाच्या विकासासाठी ग्रामसभा बळकट करा – दिलीप गोडे ग्रामसभा धामणगाव चक च्या वतीने सामूहिक वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण कामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

113

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड —-नागभीड तालुक्यातील मौजा धामणगाव चक येथे सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा , वतीने सामूहिक वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण कामाचा शुभारंभ दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी दिलीप गोडे यांचे हस्ते समन्न झाला आहे.
वनहक्क कायदा 2006 अंतर्गत समूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना 30 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णय नुसार रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळाली आहे. सदर शासन निर्णयान्वये ग्रामसभा धामणगाव चक ला वनहक्का क्षेत्रात वृक्षारोपण कामासाठी रु. 46 लाख निधीस् तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी प्रशासकीय नुकतीच दिली आहे. या वृक्षारोपण कामाला सुरुवात करण्याचे हेतूने वृक्षारोपण शुभारंभ कार्यकामाचे आयोजन समूहिक वनहक्क समिती धामणगाव चक च्या वतीने करण्यात आले होते. यावेळेस विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थाचे कार्यकारी संचालक दिलीप गोडे यांनी सांगितले की,सामूहिक दावे मिळालेले गाव नक्की श्रीमंत होणार त्यासाठी ग्रामसभा बळकट करणे काळाची गरज आहे .ज्यांना सामूहिक वन हक्क दावे मिळाले त्याच गावच्या ग्रामसभांना रोजगार हमीच्या कामाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जाहीर करावी यासाठी सरकारकडे 2019 पासून आम्ही लढा दिला आणि 30 नोव्हेंबर 2021 ला सरकारने परिपत्रक काढून त्यांना मंजुरी दिली.असे गोडे साहेबांनी गावकऱ्यांना संबोधित केले.यावेळी लेझीम व बँड पथकासह पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच शाल व पुष्पगुश्चाने दिलीपजी गोडे, कार्यकारी संचालक विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर यांचा व गुणवंत वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पर्यावरणवादी प्रणयजी आडे, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे प्रकल्प समन्वयक उमेश सहारे, रिवॉर्ड्स संस्थेचे समन्वयक भोजराज नवघडे, कैलास नन्नावरे, ICICI चे विनोद डोंगरे, सावह समिती धामणगाव चे अध्यक्ष श्री. गुरुदेव कन्नाके, सचिव अक्षय मेश्राम, ग्रुप ऑफ ग्रामसभा नागभीड चे सचिव मनोहर मगरे, कोरंबी ग्रामसभेचे सल्लागार केशव खंडाते, वासाळा मक्ता सवाह समितीचे सचिव रामप्रकाश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे कार्यकारी संचालक दिलीप गोडे यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुभारंभ करण्यात आले. प्रमुख ग्रामस्थांना प्रमुख अतिथीची समयोचित मार्गदर्शन असला. कार्यक्रमाचे स्वागत गीत सौ . दर्शना मेश्राम यांनी सादर केले, संचालन अक्षय मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन रामटेके यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समूहिक वनहक्क समितीचे सर्व पदाधिकारी, महिला प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here