*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : समय फौंडेशन च्या वतीने विधवा महिलांसह सर्वच महिलांसाठी
हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम दहिवडी येथील मार्केट कमिटीच्या हॉल मध्ये संपन्न झाला
समय चे अध्यक्ष व माजी सभापती बाळासाहेब रणपिसे यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगताना सांगितले की मानवाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे,शेतीचा शोध,व्यापाराचा शोध महिलांनी लावला. महिला राज्यकर्त्या होत्या व आपली मातृसत्ताक पद्धती होती परंतु आर्यांच्या आक्रमणानंतर पुरुषप्रधान संस्कृती सुरू झाली व महिलांना गुलाम बनविले व त्यासाठी रूढी परंपरा तयार केल्या धर्माचा आधार घेतला गेला व हजारो वर्षे महिलांवर अत्याचार होत आहेत व शोषण होत आहे त्याविरोधात गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीमाई फुले,अहिल्याबाई होळकर ,राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या हयातीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी,शिक्षणासाठी काम केले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हे हक्क अधिकार अबाधित ठेवले व समतेचा संदेश दिला हे लक्षात घेऊन महिलांनी महिलांचा सन्मान करावा ,आधार द्यावा व आपल्या अधिकारासाठी लढा द्यावा असे आवाहन केले
महामानवाच्या विचारानुसार आम्ही महिला, महिलांमध्ये भेदभाव करणार नाही असा संकल्प करून ” आम्ही साऱ्या समान,करू एकमेकींचा सन्मान ” असे म्हणून विधवा महिलांसह सर्व महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावले व तिळगुळ वाटप केले.संस्थेच्या वतीने सर्व महिलांना गजरे वाटप करण्यात आले. महिलांनी आपले कलागुण सादर करून आनंद घेतला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना कुंभार,पुष्पा भुजबळ,मनीषा शिंगाडे,विजया भोसले,राणी अवघडे,सविता अवघडे,संगीता आवटे,कल्पना खरात,आविदि तुपे,वैशाली चव्हाण,सारिका गायकवाड,पूनम गायकवाड,वर्षा जगदाळे,रंजना जाधव,मनीषा दीक्षित,सविता बनसोडे,स्वाती रणपिसे,शर्मिला रणपिसे,नीता रणपिसे,सीमा रणपिसे,नंदा रणपिसे,बायडा रणपिसे,ज्योती मिसळे,अनिता गोडसे,शीतल मिसळे,आशाताई गोसावी,प्रियांका जाधव ,माधुरी सुतार,मिनाज शेख यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमास शेकडो महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव भारती पवार यांनी केले