बीड-
शिरूरकासार येथील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘अटर का पटर’ या बालकविता संग्रहाचे प्रकाशन पहिले मराठवाडा बालकुमार मराठी साहित्य संमेलनात झाले.
‘अटर का पटर’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन पैठण येथे मराठवाडा साहित्य परिषद आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, शांतीवनचे दीपक नागरगोजे, प्रसिद्ध बाल साहित्यिक बाबा भांड, कुंडलिक अतकरे, प्रा. किरण सगर, भास्कर बडे, संतोष तांबे यांच्या हस्ते झाले. बालमनाशी निकोप साधलेला संवाद म्हणजे बाल कविता असते असे सुरेश सावंत यावेळी म्हणाले. तर विठ्ठल जाधव यांची ‘पांढरा कावळा’, ‘बटाटीची धार’, ‘उंदरीन सुंदरीन’, ही साहित्यसंपदा बालकांच्या पसंतीस उतरली. इसाप प्रकाशन नांदेडचे दत्ता डांगे यांनी ‘अटर का पटर’ बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे. प्रकाशन प्रसंगी डॉ. विनोद सिनकर, प्रशांत गौतम, रामदास केदार, उमेश मोहिते, सत्यप्रेम लगड, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. उर्मिला चाकुरकर, डॉ. भाऊसाहेब नेटके, डॉ. जालिंदर येवले, सतिश मुरकुटे, संजीवनी जाधव यांचेसह बालकांची उपस्थिती होती.