वरूड तालुका प्रतिनिधी !
आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले त्यामध्ये शहरातील तालुक्यातील शाळांमधील १० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. ही जिल्ह्यातील पहिलीच स्पर्धा असेल, ज्यामध्ये १० हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार द्वारा भव्य आमदार चषक चित्रकला स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागासह तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बाव मिळण्याच्या उद्देशाने हि स्पर्धा ग्रामीण व शहरी अशा दोन गटात दि. १३ जानेवारी रोजी ग्रामीण भागात तर रविवार दि. १४ जानेवारी, रोजी शहरी भागात अशा दोन टप्प्यात “भव्य आमदार चषक चित्रकला स्पर्धा २०२४” हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये ग्रामीण भागातील ७ हजार विद्यार्थी तर शहरी भागातील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभागी झाले असून चित्रकला स्पर्धा सर्व विद्यार्थ्याकरीता विनामुल्य ठेऊन चित्र रेखाटनाकरीता विनामुल्य ड्राईंग शीट पुरविण्यात आल्या असून या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिस स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे रोख रक्कम ३००१/- रुपये, २००१/- रुपये, १००१/- रुपये देण्यात येणार आहे. त्याशीय प्रोत्साहनपर बक्षिस सुध्दा देण्यात येणार आहे. यास्पर्धेचे बक्षिस वितरण गरुवार दि. ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदार देवेंद्र भुयार यांचे कार्यालय वरुड येथे स. १०.०० वाजता होणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार चषक चित्रकला स्पर्धेला न्यू इंग्लिश हायस्कूल,वरूड येथील प्रांगणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह आमदार देवेंद्र भुयार, गट विकास अधिकारी कानाटे साहेब, गट शिक्षण अधिकारी गाडगे साहेब, मुख्याध्यापक सायर मॅडम, काळे सर, दुपारे सर, ठाकरे सर यांच्यासह आदी मंडळींनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार उपस्थित यांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धेतील विध्यार्थ्यांना व विशेष उल्लेखनिय कलाक्षेत्रात योगदान असलेल्या शिक्षकांना कलाश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.
सपर्धेच्या यशस्वीतेकरीता कला शिक्षक वसीम शेख, समीर गौस अली, किशोर देशमुख, निळकंट नेरकर, शंकर पाटणकर, कपील तरार, रऊफ खान, कुशल अंबाडकर, जगदीश लोखंडे, वैष्णवी राऊत यासह आदींनी अथक परिश्रम घेतले.