Home यवतमाळ उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय फक्त नावालाच का? (सर्दी खोकल्याच्या औषधीचा...

उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय फक्त नावालाच का? (सर्दी खोकल्याच्या औषधीचा तुटवडा..!)

115

 

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर
(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि.१९जानेवारी) तालुक्यातील शहरातील व ग्रामीण भागाच्या रुग्णाच्या सोयीचे व उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सध्य परिस्थितीला नागरिकांना खोकल्याच्या औषधीचा तुटवडा असल्याकारणाने त्यांना मानसिक त्रासाला सध्या सामोरे जावे लागत आहे.

सध्य परिस्थितीला काही दिवसा पासून वातावरणामध्ये बदल झाल्या कारणाने संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून अचानक थंडी वाजून ताप येणे, हात पाय व अंग दुखणे,खोकला, मळमळ होणे.
या सारख्या फ्लूसारख्या आजारांची साथ सुरू आहे.

सर्दी खोकल्याच्या रुग्णाच्या संख्येत जास्त प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना पुन्हा आली काय यांची लोकांच्या मनात धास्ती भरली आहे.

आर्थिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या रुग्णांची शासकीय रुग्णालयाकडे उपचार करण्यासाठी नेहमी धाव असते. त्यामुळे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

अश्या भावना नागरिकांमध्ये सध्या व्यक्त होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here