अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :- गंगाखेड तालुक्यातील मौजे डोंगरपिंपळा येथे “जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत” जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन पाच वर्ग खोल्या व मौजे डोंगरगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रामा २३४ ते डोंगरगाव या रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.
मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामांना वाव असल्याने सर्व कामे हाती घेऊन ते पूर्ण करण्यासाठी अजून काही वर्ष लागणार आहेत. मंजूर कामापैकी बहुतांश कामे पूर्ण झाले असून काही कामे प्रगतीपथावर तर काही कामे विविध स्तरावर आहेत. हे कामे लवकर मार्गी लागणार आहेत. यापुढेही मतदारसंघातील विकास कामाकरिता निधी कमी पडू देणार नाही असेही आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी याप्रसंगी म्हटले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. संभाजीराव पोले, प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, माजी सभापती मगर पोले, पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संभुदेव मुंडे, संचालक मारोतराव साळवे, सरपंच श्रीमंत नागरगोजे, सरपंच शिवाजीराव कातकडे, सरपंच सुभाषराव गरड, सरपंच भाऊराव मुंडे, सरपंच दयानंद घरजाळे, विश्वनाथ मामा बिडगर, सरपंच वैजनाथराव तिडके, उपसरपंच माणिकराव कतारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.