Home महाराष्ट्र जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नामदेवराव...

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये महाविद्यालय स्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.

86

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड .- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे ‘नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, फलटण’ येथे शनिवार दिनांक 06/01/2024 रोजी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उदय जाधव हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी सादर केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा, वक्तृत्व स्पर्धेचे औचित्य, वक्तृत्व कला, पाण्याचे महत्व, शासन स्तरावरील दुष्काळ निवारण उपाययोजना याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. यानंतर संयोजन समितीच्या वतीने उपस्थितांचा स्वागत सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये बी. ए. व बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे होते: 1.पाऊस पाणी संकलन, 2.पाणी आडवा पाणी जिरवा, 3.जल हेच जीवन, 4.माझ्या गावातील पाणीपुरवठा, 5.पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, 6.पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती इत्यादी. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक, प्रभावीपणे, ओघवत्या शैलीत, देहबोलीचा वापर करून, उदाहरण-दाखले व काव्यओळींचा वापर करून अत्यंत उत्साहात आपले वक्तृत्व सादर केले. तसेच श्रोते गणात असणाऱ्या विद्यार्थी वर्गाने त्यांना टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद दिला. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश बापू नामदास (बी. ए. भाग 2) यांनी प्रथम क्रमांक, कु. तृप्ती शशिकांत माने (बी. ए. भाग 3) द्वितीय क्रमांक तर कु. ज्ञानेश्वरी देविदास बिबे (बी. कॉम. भाग 1) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणाचे कार्य प्रा. डॉ. सतेज दणाणे, प्रा. डॉ. तेजश्री रायते, प्रा. श्री. श्रेयस कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्री. श्रेयस कांबळे, स्पर्धा नियम निकष मार्गदर्शनाचे कार्य प्रा. डॉ. सतेज दणाणे तसेच आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा. कु. रचना धुमाळ यांनी केले. वेळ पालक व छायाचित्रणाचे कार्य प्रा. विठ्ठल गौंड यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. सौ. भावना झेंडे, प्रा. सौ. मुळीक एम. एस., प्रा. कु. अमृता भोसले, प्रा. सौ. प्रणाली बर्गे इत्यादी प्राध्यापक वर्ग विचार मंचावर उपस्थित होता. तसेच बी. ए. बी. कॉम. च्या विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशाप्रकारे अत्यंत उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या महाविद्यालयस्तरीय वक्तृत्व स्पर्धेनंतर या स्पर्धेमधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पंचायत समिती येथे होणाऱ्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठवण्यात आली. उपस्थित सर्व प्राध्यापक व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here