*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या एका पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात दलित पॅंथरच्या स्थापनेपासूनच अन्याय विरोधात आवाज उठवला होता. या घटनेला बराच कालावधी झाला असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार निमित्त साताऱ्यात प्रथमच दलित पॅंथरच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
सातारा जिल्ह्यातील दलित पॅंथर व त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीमध्ये वैचारिक भूमिका घेऊन लढणारे लढवय्या भीमसैनिक म्हणून अनेकांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. परंतु, त्यांनी कधीही त्याचा राजकीय अथवा आर्थिक, सामाजिक लाभ घेतलेला नाही. आजही स्वाभिमानाने चळवळीसाठी योगदान देत आहेत .अशा हाडाच्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम एकेकाळी करण्यात आले होते. त्यानंतर अनेक जण नावारूपाला आले होते . सातारचे माजी नगरसेवक तथा क्रांती थिएटरर्सचे प्रमुख अमर गायकवाड, ,अरविंद गाडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर आठवले, अशोक भोसले, धनाजी वाघमारे ,युवराज कांबळे, रियाज बागवान, आर. आर. रसाळ व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वैचारिक देवाण-घेवाण झाली .अलीकडच्या काळामध्ये चळवळीचा स्वरूप बदललेले आहे. पण, अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत.
सध्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलला असला तरी आजही फुले- शाहू -आंबेडकर विचारांसाठी प्राणाची भाजी लावून लढणारे पँथर आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा पँथरचा आवाज सातारा जिल्ह्यात घुमू लागला आहे.त्यामुळे नव क्रांतीची आशा पल्लवी झालेली आहे. आज झालेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वश्री अंबादास शिंदे ,अजय कांबळे व अजित जगताप, अरुण जावळे, बाळासाहेब शिरसाठ, शंकर जाधव,तसेच मान्यवरांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले एकूणच या कार्यक्रमापूर्वी त्यांच्या चळवळीत खूप मोठे योगदान दिले पण आता हयातीत नसलेले पँथर चंद्रकांत अहिवळे, संजय गायकवाड, राजू माने, किशोर तपासे यांना अभिवादन केले.
सातारा नगरपरिषदेच्या शेजारी झालेल्या सुटा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला संपूर्ण सातारा जिल्ह्यातील लक्ष लागले होते. प्रारंभी युगपुरुषांच्या विचारणा अभिवादन करून त्यानंतर नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
या वेळेला कृष्णा गव्हाळे, शेखर मोरे, प्रा लाडे, शाहीर प्रकाश फरांदे, संजय नित्यनवरे, ॲड. प्रभाकर कांबळे, रियाज बागवान, डॉ. मृणाली अहिर , वैशाली शिंदे,ज्ञानेश्वर रावखंडे, उमेश खंडझोडे ,विकास तोडकर ,ज्योती तोडकर, शंकर साठे, गौतम भोसले, विवेक म्हस्के ,अनिस मेमन, कुंदन तडाखे, नितीन कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही चळवळीत कार्यक्रम आयोजित केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना पाणी सुद्धा मिळत नाही. याचा अनेकांनी अनुभव घेतला. पण, आज नाद विस्तार दिनानिमित्त आयोजित केलेल्या दलित पॅंथर कार्यक्रमात सर्व पॅंथरचना स्नेहभोजन दिल्याने अनेकांना चळवळ कात टाकत असल्याचे चित्र दिसून आले.
दलित पॅंथरच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पँथर अरविंद गाडे यांची सर्वानुमते टाळ्याच्या गजरात निवड केली. त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्यात दलित पँथर संघटनेचे पुनर्जीवन झाल्याची कार्यकर्त्यांना खात्री झाली आहे.