मोर्शी तालुका प्रतिनिधी :
मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या वतीने अंबाडा, मोर्शी महसूल मंडळामधील संत्रा फळबाग विमा कृषी खात्याने तसेच राज्य सरकारने आदेशित करून सुद्धा विमा कंपनीने अजून पर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंजूर झालेल्या एक ट्रिगर चे पैसे वाडते केले नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील हजारो संतत्प शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय मोर्शी येथे धडक देऊन १० दिवसाच्या आत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र चाक्कजाम आंदोलन करण्याचा इशारा शासनाला देण्यात आला.
मोर्शी तालुक्यातील संत्रा फळबाग पिक विमा सोबतच गारपीट अनुदान अजून पर्यंत तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तसेच रिद्धपूर मंडळ आणि अंबाडा मंडळ मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली जवळ जवळ 17000 शेतकरी बाधित झाले त्यामध्ये त्यांना फक्त 60 टक्के अनुदान नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये वाडते केले आहे ते सुद्धा शंभर टक्के देण्यात यावे सर्वेक्षण करत असताना गारपीटग्रस्त यादी मधून काही शेतकऱ्यांना वगळण्यात आले त्या शेतकऱ्यांचा समावेश यादीमध्ये करण्यात यावा तसेच एचडीआरएफ च्या धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी शासनाचे आदेश असताना सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मध्ये मिळणारी रक्कम ही अत्यल्प आहे व त्यातूनही काही शेतकरी वगळले गेलेले आहेत त्याकरिता या सर्वांचा यामध्ये समावेश करावा या सर्व बाबींना येत्या दहा दिवसांमध्ये प्रशासनाकडून अनुकूल अशी हमी न मिळाल्यास येरला आणि अष्टगांव या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करून शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत बाजार समितीचे संचालक सारंग खोडस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, पंचायत समिती सदस्य सुनील कडू दिनेश घोरमाडे शरद काटोलकर विलास आघाडे माजी पंचायत समिती सदस्य किशोर कनेर सभापती यादवराव चोपडे विजय चिखले प्रशांत राऊत किशोर जिचकार गोपाल मालपे बाळासाहेब भोजने राजीव भोजने मोहन उमप अंकुश धावडे शेखर गांजरे राजेश पेठे गणेश गोरमाडे प्रमोद हरणे गजानन चौधरी विनोद उकंडे, सुनिल ठाकरे,साहेबराव मस्की अंबादास गुडधे संजय काळे सुशील धोटे नारायणराव सुर्वे नवीन पेठे संतोष पेठे उद्धव चिखले सागर खांडेकर दीपक इंगळे मनीष दारुकर नामदेव महल्ले विशाल डेहणकर अतुल टेंभे गोपाल टाकडे कुमार राऊत नरेंद्र नंदुरकर, प्रकाश राऊत लीलाधर चढोकार विजय सितकारे सरपंच गणेशपूर, नंदकिशोर वाघमारे सरपंच ग्रामपंचायत मायवाडी, हरिविजय गेडाम दिगंबर खडगडे नवल भाऊ अग्रवाल वसंतराव गेडाम सुनील गेडाम रंजीत गेडाम प्रवीण चौधरी प्रमोद भाकरे शेखर गावंडे विलास माथनकर निलेश गलफट शेखर विघे, रंगराव खंडारे अमोल ढोमणे नरेंद्र राऊत सुरज तोमर मनोज लोहकरे मंगेश ढगे राजेश खाडगडे, दुर्गेश केचे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
—–
मोर्शी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा, फळ पीक वीमा योजनेत सहभाग घेतला, त्यांना विमा मदत कंपन्यांनी देणे अत्यावश्यक होते, पण यात मोठा घोळ समोर आला आहे. कृषी आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून देखील विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याचे टाळले. येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही, तर शासाना विरोधात वेगळी भूमिका जाहीर करू — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष .
—-
गारपिट, अतिवृष्टीग्रस्त, वीमा धारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विमा कंपन्यांनी टाळाटाळ चालवली असून विम्याच्या रकमेचे वाटप करण्यास वीमा कंपनी दिरंगाई करत आहे. नुकसानीनंतर पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम देणे आवश्यक होते. पण, ही रक्कम देण्यात आली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा शेतकऱ्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाला शासनाला सामोरे जावे लागेल – प्रवीण राऊत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष .