कराड : (दि.१३, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे विद्यार्थांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम अर्थांत वार्षिक स्नेह संमेलन शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी पी. डी. पाटिल सभागृहात अतिशय उत्साही व चैतन्यदायी वातावरणात संपन्न झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी,मा. श्री. अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे विश्वस्त व सदस्य मा. श्री.अरुण पाटील (काका) आवर्जून उपस्थित होते. महाविद्यालयातील कोणताही कार्यक्रम सर्वोत्कृष्ठ होण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले. महाविद्यालयातील विध्यार्थी कलाकारांनी अतिशय सुंदर विविध कला प्रकारातील सादरीकरण करून विद्यार्थी रसिकांची मने जिंकली. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल अभिनंदन करून करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते नटराज पूजनाने व ईशस्तवनाने करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये एकूण 70 कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये विविध 30 प्रकारातील नृत्य व कला सादर करण्यात आल्या. यामध्ये गणेश वंदना, शेतकरी गीते, लोकनृत्य, भारुड, लेझीम, सोलो व बॉलीवूड गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. डॉ. एन. ए. पाटील सरांनी मानले. तर प्रा. एस. एस. बोंगाळे यांच्या बरोबर महाविद्यालयातील कु. मानसी वाडकर व कु. दर्शना बाबर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.