Home यवतमाळ गावंडे महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात उसळला तरूणाईचा सागर

गावंडे महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात उसळला तरूणाईचा सागर [रात्री उशीरापर्यत मुलाखतीची प्रक्रिया सुरू ; 2439 युवकांनी नोंदविला सहभाग]

191

 

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दि.14 जानेवारी) ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार राहू नये या दृष्टीने दि.13 जानेवारी रोजी गावंडे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात तब्बल 2439 युवकांनी सहभाग नोंदविला तर रात्री उशिरापर्यंत मुलाखतीची प्रक्रिया सुरूच होती.
तालुका स्तरावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करून बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे गावंडे महाविद्यालय हे या निमित्ताने विदर्भातील पहिले महाविद्यालय ठरले. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या. विद्यार्थी, उमेदवारांची त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी विविध पदांवर निवड करण्याची प्रकीया चालु होती .
अगदी छोटेखाणी पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर , सचिव डॉ. यादवराव राऊत, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, प्रा. डॉ. धनराज तायडे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुलाखत देण्यासाठी आलेले उमेदवार उपस्थित होते.
यापूर्वीही गावंडे महाविद्यालयाने अशाच पद्धतीने अनेकदा मेळावे घेऊन शेकडो विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नौकऱ्या मिळवून दिल्या आहेत.

रोजगार मेळाव्यापूर्वी महाविद्यालयाच्या वतीने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य व मुलाखतीचे तंत्र यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन त्यांची संपूर्ण पूर्व तयारी महाविद्यालयाने करुन घेतली होती.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांच्या मार्गदर्शनात, योगेश वनकर, मारुती आलट व अभिजीत चौधरी , अभिजित पवार , यांच्या सहकार्याने प्राचार्य डॉ. माधवराव कदम, प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक प्रा. आय. वाय. खान, प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते तसेच उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
—————————————-

आमचे विद्यार्थी व तालुक्यातील बेरोजगार युवक कोणत्याही बाबतीत मागे राहू नये यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करत राहू आणि परिसरातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आजच्या रोजगार मेळाव्यात दुपारी 3:30 पर्यंत जवळपास 2500 युवकांची नोंद करण्यात आली होती तर त्यानंतर आलेल्या जवळपास 300 ते 350 युवकांना वेळेअभावी पुढच्यावेळी संधी प्राप्त करून देण्यात येतील अशी प्रतिक्रिया राम देवसरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना दिली .
—————————————-

ग्रामीण भागात राहून लहानपणी व महाविद्यालयात शिक्षण घेताना खूप अनुभव आले.
शाळा, महाविद्यालय व संस्थांमुळे मी घडलो. या परिसरातील युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी पुढाकार घेतला.

संस्था, महाविद्यालयाची फार मोठी शक्ती त्यांनी यासाठी उभी केली, म्हणून हा रोजगार मेळावा भव्य दिव्य झाला.
मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या याचे श्रेय राम देवसरकर यांचेच आहे. माझा या मेळाव्यासाठी फक्त खारीचा वाटा आहे.

युवकांसाठी काही करता आले याचे समाधानही आहे .अशी प्रतिक्रिया साहेबराव कांबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना दिली.
—————————————-

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे, एल्युरा टेक प्रा. लि., नागपूर, बिस्मी टेक्नॉलॉजी, नागपूर, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. पुणे, जीबीजे बझ प्रा. लि., नागपूर यांच्यासह भारतातील ३० नामांकित कंपन्या पहिल्यांदाच उमरखेडसारख्या तालुका पातळीवर आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here