✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड – (दि. 14 जानेवारी) तालुक्यातील मुळावा गाव नामांकितच, सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गावाने अनेक नेतृत्व दिले,पंचायत समिती सदस्य,सभापती,जिल्हा परिषद अध्यक्ष,ते विधानसभा आमदार या गावाने दिले,पण याच गावातील नागरिक जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाने त्रस्त झाले आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून गावात शासनाने लाखो रुपये खर्च करून केलेले सिमेंट रस्ते फोडून पाईप लाईन टाकण्याचं काम सुरू आहे,
भर रस्त्याच्या मध्यभागी नाल्या पडल्याने नागरिकांना चालणे देखील अवघड झाले आहे,रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम झाल्याने सीमेंट रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून मध्यभागी खोदकाम करून पाईप टाकून बूजलेल्या मालाचा एक फुटापर्यंत ढीग आहे त्यामुळे नागरिकांना पैदल चालताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जल जीवन मिशनचा उद्देश राज्यांच्या त्या ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे, अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आणि लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते. पण जल जीवन मिशनचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.
घरोघरी पाणी देण्याच्या योजनेवरून गदारोड झाला आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आल्याचा आरोप
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब देशमुख यांनी केला आहे, हर घर नल से जल योजनेवरून गदारोड झाला आहे.
हे पाईप स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे टाकण्यात आल्याचा आरोप यांनी केला. त्याचबरोबर दर्जेदार कंपनीचे पाईप टाकण्या ऐवजी स्वस्त कंपनीचे पाईप गावात टाकण्यात आले आहेत. ते सहज पणे तुटत आहे. व इतर कारणांमुळे त्याचे नुकसान होऊ शकते.
या सर्व बाबीकडे ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील होत आहे, त्यामुळे मुळावा येथे जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.