Home यवतमाळ वनपरिक्षेत्रामध्ये अनेक मोठे वन गुन्हे घडल्यामुळे वरिष्ठाकडे केली सखोल चौकशीची मागणी

वनपरिक्षेत्रामध्ये अनेक मोठे वन गुन्हे घडल्यामुळे वरिष्ठाकडे केली सखोल चौकशीची मागणी

220

 

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)

उमरखेड (दि. 13 जानेवारी) वन परिक्षेत्रामध्ये अनेक मोठे वन गुन्हे घडले आहेत व याच्या तक्रारी सुद्धा मुख्य वनसंरक्षक यवतमाळ व उपवनसंरक्षक पुसद यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत.

परंतु हे वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्याचे सोडून खालील कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीदायक माहिती आहे.

वन गुन्हे उघड करायचा प्रयत्न कितीही करा वरिष्ठ अधिकारी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे उमरखेड येथील जागरुक नागरीक व पत्रकार डॉ. आंबेजोगाईकर, पत्रकार विजय कदम, पत्रकार राजेश खंदारे, सुभाष वाघाडे व विश्वास काळे हे २२ जानेवारी ते पासून २४ जानेवारी पर्यंत तहसील कार्यालय उमरखेड च्या प्रांगणात ऑफिस वेळेमध्ये साखळी उपोषण करणार आहेत.

जर २४ जानेवारी २०२४ पर्यंत वनविभागातील चौकशा झाल्या नाहीत व संबंधित दोषी अधिकारी – कर्मचारीवर कारवाई झाली नाही.

तर २४ जानेवारी २०२४ च्या दुपारपासून हे सर्वजण बेमुदत आमरण उपोषणाला त्याच ठिकाणी बसणार आहेत.

अशा तक्रारी त्यांनी दि. ११ जानेवारी २०२४ रोजी मुख्य वनसंरक्षक वनवृत यवतमाळ -उपवनसंरक्षक पुसद – उपविभागीय अधिकारी (महसूल) उमरखेड उपविभागीय वन अधिकारी उमरखेड तथा तहसीलदार व ठाणेदार उमरखेड यांना लेखी स्वरूपात माहितीस्तव कळविले आहे.

जनतेच्या हितासाठी व शासनाची वन चोरी उघड झाली असतांना ही कार्यवाही थातूर -मातूर झालेली आहे ती वन नियमाप्रमाणे व्हावी.

आमच्या वर उपोषणाची पाळी येऊ द्यायची नसेल असे वाटत असेल तर मुख्य वनसंरक्षक यवतमाळ व उपवन संरक्षक पुसद यांनी त्वरीत कार्यवाही करावी.

अशी मागणी विजय कदम यांनी केली आहे.
उमरखेड वन परिक्षेत्रामध्ये अनेक गंभीर गुन्हे घडले असून हे गंभीर गुन्हे उघड करून सुध्दा वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचाच प्रयत्न करत असल्याचे आतापर्यत दिसून आलेले आहे .यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून डॉ आंबेजोगाईकर, विजय कदम राजेश खंदारे, वरिष्ठाकडे वारंवार तक्रारी केल्या.

परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणात गंभीर पणे चौकशी करण्याचे सोडून वन कर्मचाऱ्यांना वाचवण्याचाच प्रयत्न केलेला दिसत आहे.

या प्रकरणात काय कार्यवाही होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here