*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : महाराष्ट्रात महिला वर्गाला शिक्षणाचे द्वार खुले करून देणारे राष्ट्रपिता महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने शैक्षणिक क्रांती घडली. त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गोवे ता. सातारा येथील श्री कोटेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनी व गुरुजनांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाल वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरणामध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्या बद्दल श्री कोटेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेज गोवे. ता. जि. सातारा येथील प्राचार्या श्रीमती विभा साबळे तसेच मार्गदर्शक शिक्षक लक्ष्मण उबाळे , विद्यार्थी आदित्य जाधव व यश संपकाळ यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ, रुपालीताई चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग, ना. श्री. शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा, आमदार मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे , आ. महेश शिंदे, नायगाव महिला सरपंच सौ नेवसे, सौ शारदा जाधव, पुरुषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी जितेंद्र दुधी, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी पोलीस अधीक्षक समीर शेख, शिक्षण अधिकारी व पद्मावती कोळेकर, शबनम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते .
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात बाल वैज्ञानिक प्रकल्पाच्या माध्यमातून विज्ञानावर निष्ठा ठेवून या विद्यार्थ्यांनी नवीन शोध व नवीन संकल्पना पुढे आणलेले आहे याचाही मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.श्री कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाभाऊ जाधव , सचिव तुकाराम जाधव, सचिव जिजाबा आण्णा स्मारक समिती गोवे भुजंगराव जाधव व सर्व संचालक, ग्रामस्थ , पालक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.