चंद्रपूर, दि. 8 : आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 7 ते 9 जानेवारी 2024 ला गरुडझेप अकॅडमी, नाशिक येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी नागपूर विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथील देवाडा, बोर्डा, तोहोगाव, सुब्बई, जानाळा, देलनवाडी, डोंगरगाव, सरडपार, राजुरा, भारी, दुर्गापूर या शाळेचे 9 मुली व 18 मुले असे एकूण 27 खेळाडूंनी कब्बड्डी, खो- खो,व्हॅलीबाल, हॅन्डबाल, वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर उंच भरारी घेतली असून सर्व खेळाडू नाशिकला रवाना झाले आहेत.
दरवर्षी शालेय व आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थी सहभाग घेतात. विभाग व राज्य स्तरावर आपल्या प्रकल्पाचे नाव उंच करतात. खेळ, सांस्कृतिक, व शैक्षणिक क्षेत्रात चंद्रपूर प्रकल्प अग्रेसर आहे, या स्पर्धेसाठी क्रीडा व्यवस्थापक, क्रीडा नियोजनसाठी सुरेश श्रीरामे, उमेश कडू, किशोर चिंचोलकर, सुनिता हतिमारे, श्रीहरी आत्राम, वर्षा मडावी हे सर्व कर्मचारी नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे.
वरील स्पर्धेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम., श्री. टिंगूसले, श्री. बोंगीरवार, श्री. धोटकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. पोड, श्री. कुळसंगे, श्री. चव्हाण, श्रीमती कुतरमारे तसेच प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी व शासकीय, तथा अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.