धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर
धरणगांव – धरणगाव शहरातील स्वामी विवेकानंद पतसंस्थेत राष्ट्रीय पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार लक्ष्मणराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. व्ही.एस.भोलाणे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शहराध्यक्ष विनोद रोकडे, ज्येष्ठ पत्रकार धर्मराज मोरे यांच्या शुभहस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्रीजी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी शहरातील पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड.व्ही.एस.भोलाणे, धर्मराज मोरे, विनोद रोकडे, पी डी पाटील, लक्ष्मणराव पाटील, निलेश पवार,धनराज पाटील तसेच शहरातील पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.