Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न !….. खेळ खेळणे...

महात्मा फुले हायस्कूल येथे क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न !….. खेळ खेळणे आरोग्यासाठी फायदेशीर – एच.डी.माळी. ( क्रिडा शिक्षक )

139

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या, भारतातील थोर समाजसेविका, भारतातील प्रथम महिला मुख्याध्यापिका व शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक, विद्येची खरी देवता, स्फुर्तिनायिका, ज्ञानज्योती, महानायिका, विचारवंत, शिक्षणतज्ञ, आद्य कवयित्री, आईसाहेब क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शाळेमध्ये तीन दिवस क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
प्रस्ताविक पी.डी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक एम बी मोरे होते. ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील क्रीडा शिक्षक एच डी माळी यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांना विस्तृतपणे सांगितले. यासोबतच खेळाचे महत्व सांगून क्रीडा महोत्सवात खेळ खेळल्याने खेळाडू वृत्ती निर्माण होते असे प्रतिपादन माळी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे यांनी विविध खेळांची माहिती व नियम विद्यार्थ्यांना विस्तृतपणे सांगितले.
या तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धिबळ, लिंबू – चमचा, एक मिनिट स्पर्धा, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, लांब उडी, १०० मी. रनिंग, स्लो सायकल, गोणपाट स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन मनमुराद खेळाचा आनंद घेतला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, एम बी मोरे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे.महाजन, ग्रंथपाल गोपाल महाजन, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, अरुण शिरसाठ, तुषार पाटील, जीवन भोई, अशोक पाटील यांनी उपस्थिती देऊन क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here