जगदीश का. काशिकर,
मो. ९७६८४२५७५७
मुंबई: मास्टर पॉलिश प्रा.ली. या कंपनीत गेल्या 15 ते 20 वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अचानक कामावरून कमी केले. सदरील कामगारांनी व्यवस्थापनाकडे गेल्या 15 ते 20 वर्षाचा कायदेशीर हिशोब मागितला असता तुम्ही कुठेही जा तुम्हाला काहीही मिळणार नाही अशी धमकी दिली.
कामगारांना आपल्यावर आलेले संकट फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडवू शकते हे लक्षात आल्यावर सर्व कामगारांनी मनसे अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कामगार सेनेचे सरचिटणीस श्री. गजानन राणे यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. कामगारांच्या समस्या समजावून घेवून श्री. गजानन राणे यांनी तत्काळ पदाधिकाऱ्यांना संबंधित कंपनीशी संपर्क करायला सांगितला.
सदरील कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क झाल्यावर मनसे स्टाईल ने व्यवस्थापनाला कामगारांची गेल्या 15 ते 20 वर्षाची कायदेशीर देणी 8 दिवसाच्या आत देण्यास सांगितले. व्यवस्थापनाने मागणी मान्य करून सर्व कामगारांना योग्य ती कायदेशीर देणी दिली. सर्व कामगारांनी आदरणीय राज ठाकरे कामगार नेते श्री. गजानन राणे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आभार मानले.