Home बीड पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉलसाठी अजय राठोडची निवड

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉलसाठी अजय राठोडची निवड

82

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

नुकतेच पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धा झाल्या . बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा भूमिपुत्र अजय अण्णासाहेब राठोड हा मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे संघाकडून खेळत होता. त्याने ३ सामन्यात ४ गोल आणि २ असिस्ट केले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात आपले स्थान निश्चित केले. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धा ३१ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०१४ दरम्यान हैद्राबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबई येथे होणार आहेत. जवळपास 1,000 खेळाडू निवड चाचण्यांसाठी उपस्थित होते. त्यातून केवळ २० खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात अजयचा पहिल्या १० मध्ये समावेश आहे . सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे फुटबॉल संघात त्याची निवड झाली आहे .तो त्याच्या संघातील सर्वात तरुण खेळाडू आहे. अजय हा गेवराई तालुक्यातील तांड्यावरचा खेळाडू असून त्याने शालय शिक्षण शिवशारदा पब्लिक स्कूलमध्ये घेतले . तो शारदा स्पोर्टस अॅकॅडमी चा खेळाडू आहे .त्याला क्रीडातज्ज्ञ रणवीर पंडित व फुटबॉल कोच नविद मशायक यांचे मार्गदर्शन लाभले होते . अजयची निवड झाल्याबदल जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी आ . अमरसिंह पंडित , माजी जि प अध्यक्ष विजयसिंह पंडित, रणवीर पंडित, नविद मशायक आदींनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here