Home महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर खात्यांतर्गत कारवाई करावी : अंकुश नामदास ...

शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर खात्यांतर्गत कारवाई करावी : अंकुश नामदास अमरण उपोषणाचा दिला इशारा

221

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड :- गटशिक्षणधिकारी पदी पंचायत समिती माण येथे असणारे पिसे यांच्याकडे असणारा पदभार हा सेवा ज्येष्ठतेनुसार नसून त्यांनी शासनाची फसवणूक करून मिळविला असल्याचा आक्षेप अंकुश नामदास यांनी घेतला असून त्याविरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे सदर नियुक्ती रद्द न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

सदर पत्रात नमूद केले आहे कि पंचायत समिती माण च्या गटशिक्षण अधिकारी पदाचा पदभार सध्या श्री.पिसे.एल.एम यांच्याकडे आहे सातारा जिल्हा परिषदेने दि.०१/०१/२०२३ रोजी केलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग – २ च्या सेवा जेष्ठता यादीमध्ये श्री.पिसे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग- २ पदी सेवा सुरू तारीख १७/ ७/ २००६ अशी नमूद केली आहे तथापि श्री.पिसे हे सप्टेंबर २००७ मध्ये आंतरजिल्हा बदलीने पंचायत समिती माण येथे हजर झाले असून. त्यांची ज्येष्ठता खंडित होत असतानाही त्यांना सेवा जेष्ठ समजून माण पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे दिलेला आहे. तरी त्यांच्याकडील सदरचा पदभार तात्काळ काढून घेऊन तो सेवा जेष्ठ अधिकाऱ्यास देण्यात यावा. तसेच शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधितावर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी
सदर बेकायदेशीर नेमणूक रद्द न केल्यास आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यास
दि.१०/०१/२०२४ पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा नामदास यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here