Home महाराष्ट्र भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बंगल्यात हायटेक माहिती यंत्रणा कार्यान्वित

भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बंगल्यात हायटेक माहिती यंत्रणा कार्यान्वित

254

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड : सातारा जावलीचे भाजप तरुण तडफदार व कर्तव्यदक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा शहरातील सुरुची बंगल्यावर कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होत असते. अनेकांची कामे मार्गी लावल्यानंतर ते नियोजित कार्यक्रमालाच जातात.
शहर असो की गाव, वाडी , वस्ती या ठिकाणी केलेल्या सर्व विकास कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी आ. भोसले यांची स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा काम करते. तरीही नव तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून सध्या हायटेक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सुरुची बंगला या ठिकाणी यंत्रणा बसवलेली आहे. ही यंत्रणा पाहण्यासाठी ग्रामीण भागातून आलेले वयोवृद्ध तसेच पत्रकार मंडळी, तरुण कार्यकर्ते या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीचा माध्यमातून विकास कामे पाहू शकत आहेत.

काही वेळेला कार्यकर्ते कमी पण ठेकेदारांची गर्दी असते.अशा वेळी आमदार निधीतून होणाऱ्या शासकीय इमारत असो किंवा रस्ते अथवा इतर विकास काम उत्कृष्ट दर्जाची झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवू नये. अशा शब्दात सूचना करूनच ते या कामाला हिरवा कंदील दाखवतात. त्याचे कौतुक होत आहे. सर्वसामान्य मतदारांना आमदार भेटत असल्याने आ .भोसले यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आमदार भेटीनंतर समाधान पसरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकदा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी बातमी येत होत्या. पण अद्यापही त्याला यश आले नसले तरी आ. भोसले यांनी हायटेक यंत्रणेचा वापर करून हम भी कुछ कम नही ….. हेच सातारा जिल्ह्यात दाखवून दिलेले आहे.
वास्तविक पाहता आ. भोसले हे फक्त सातारा- जावलीचे आमदार नसून सहकारी संस्था व शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या भेटीसाठी अनेक जण आतुर झालेले असतात. प्रशासनाचा दांडगा अनुभव व मित्र परिवारांचे मोठे जाळे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना कोणतीच अडचण नाही. उलट त्यांच्या मताधिक्यामध्ये अधिकाधिक वाढ होईल. अशी माहिती त्यांचे जवळचे कार्यकर्ते फिरोज पठाण , प्रविण देशमाने, महेश देशमुख व धनंजय जांभळे, नवनाथ जाधव यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.
एकेकाळी आमदार निधी, डोंगरी विकास निधी, स्थानिक विकास निधी याची माहिती मिळत नव्हती. परंतु आता फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर व प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून पारदर्शक रित्या सर्व आलेला निधी व त्याचा तपशील हा मिळत आहे .भविष्यात आ. भोसले हे राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर मोठी भरारी मारतील. त्यामुळे त्यांच्या कार्याला अनेकांनी प्रोत्साहन दिले आहे. आगामी राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याला खूप मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here