अहमदनगर – वाढत्या ताण-तणावांमध्ये वाचन महत्त्वाचे असून वाचनामुळे माणूस समृद्ध बनत आहे. उपलब्ध असूनही माणसे पुस्तके वाचत नाहीत हे हेरून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शब्दगंध च्या नेवासा तालुका शाखेच्या वतीने सुरू केलेले प्रयत्न निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत,’असे मत शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, नेवासा तालुका शाखेच्या वतीने आयोजित माळी चिंचोरा येथील मोफत फिरते वाचनालय उपक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक जनार्दन चिंधे होते. माजी कुलगुरू डॉ.अशोक ढगे, तालुका शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ.किशोर धनवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे,दिगंबर गोंधळी, पांडुरंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
– ‘वाचना शिवाय प्रगती होवू शकत नाही हे सर्वमान्य असूनही सध्या सर्व युवापिढी मोबाईलमध्ये गुंतलेली दिसते. वाचन संस्कृती मागे पडून मोबाईल संस्कृती पुढे येत आहे.खरं तर मानवी जीवनात येणाऱ्या विविध प्रसंगांना तोंड देण्याचे ज्ञान पुस्तके देतात,’ असे अध्यक्षपदावरून बोलतांना जनार्दन चिंधे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. बापूसाहेब चिंधे यांनी केले तर वाचनाचे महत्व समितीचे सल्लागार डॉ.अशोक ढगे, तालुका अध्यक्ष डॉ.किशोर धनवटे,ॲड बापूसाहेब चिंधे, उपसरपंच दिलिप धानापुणे, सुर्यभान चिंधे,पिटर वाघमारे , हसनभाई सय्यद यांनी विषद केले.
शब्दगंधच्या तालुका कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी वाद्यासह वाचनाचे महत्व गोंधळ गित गाऊन विशद केले. शब्दगंध नेवासा शाखेच्या फिरते मोफत वाचनालय या उपक्रमात ग्रामस्थ नानासाहेब चिंधे,मुळाचे संचालक रावसाहेब शेंडे,पोलिस पाटील विठलराव शेंडे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र चिंधे, संजुभाऊ चिंधे,रावसाहेब शेंडे,एकनाथ वाबळे,नानासाहेब चिंधे,दादासाहेब बोरुडे,विजय पुंड,सतिष देव्हारे,राजेद्र जाधव , किशोर चिंधे ,नितिन चिंधे, प्रविण शेंडे,कैलास चौधरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब चिंधे यांनी केले तर शेवटी शब्दगंधचे सदस्य, कवी अनिल चिंधे यांनी आभार मानले . यावेळी २०२२ चा राहिलेला शब्दगंध साहित्य पुरस्कार अनिल चिंधे यांच्या भाऊबंदकी या कथासंग्रहास मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास माळीचिंचोरा येथील ग्रामस्थ, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.