Home यवतमाळ विकसित भारत संकल्प यात्रा, प्रधानमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद ...

विकसित भारत संकल्प यात्रा, प्रधानमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद आ.डॅा.धुर्वे, आ.डॅा.उईकेंची उपस्थिती-विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम

170

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ, दि.17 (जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्ह्यात ठिकठिकाणी या संवादाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. या संवाद कार्यक्रमास आमदार डॅा.अशोक उईके, आमदार डॅा.संदीप धुर्वे उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या योजनांची जनजागृती तसेच या योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी दि.15 नोव्हेंबर पासून देशभर विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागात जनजागृती रथाद्वारे योजनांची प्रचार प्रसिद्धी केली जात असून पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जात आहे. ही मोहिम दि.26 जानेवारी पर्यंत चालणार आहे.

या उपक्रमानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभर लाभार्थ्यांशी संवाद साधला. L

या संवादाचे जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी लाईव्ह प्रसारण करण्यात आले. त्यात यवतमाळ तालुक्यातील मडकोना, उमरखेड तालुक्यातील दराटी, पुसद तालुक्यातील बन्सी, केळापूर तालुक्यातील वांजरी, राळेगाव तालुक्यातील वडकीसह अन्य गावांचा समावेश आहे.

उमरखेड तालुक्यात या संवाद कार्यक्रमास आ.डॅा.अशोक उईके, केळापुर तालुक्यातील वांजरी येथे आ.डॅा. संदीप धुर्वे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान केंद्र शासनाच्या विविध योजनांपासून वंचित तथापी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी आ.डॅा.अशोक उईके व आ.डॅा.संदीप धुर्वे यांनी देखील गावकऱ्यांशी संवाद साधला. काही लाभार्थ्यांना यावेळी लाभाचे वाटप देखील करण्यात आले.

वंचित लाभार्थ्यांना थेट विविध योजनांचा लाभ उलब्ध करून देण्यासाठी या सर्व ठिकाणी विविध विभागांचे स्टॅाल लावण्यात आले होते.येथे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

आरोग्य तपासणीसह वेगवेगळ्या योजनांचा थेट लाभ देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here