Home नागपूर नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडाचा नववा स्थापना दिवस साजरा

नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडाचा नववा स्थापना दिवस साजरा

132

 

नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडाचा आज दि. 17 डिसेंबर 2023 रोजी नववा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र मर्या., नागपूर यांच्यात नवव्या स्थापना दिनानिमित्त वन्यजीव संवर्धनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामंजस्य करार करून गोरेवाडा बचाव केंद्राच्या आवारात केंद्राची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी श्री. विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण हे प्रमुख पाहुणे म्हणून तर विशेष पाहुणे श्रीमती. राधीका रस्तोगी, प्रधान सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, तसेच माननीय राज्यपालांचे नियंत्रक श्री. रमेश येवले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. एस. व्ही. उपाध्ये, संचालक, वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा हे अध्यक्षस्थानी होते.

श्री. विकासचंद्र रस्तोगी, श्रीमती. राधीका रस्तोगी, श्री. रमेश येवले आणि डॉ. नितीन कुरकुरे च्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उत्सवा ची सुरुवात झाली. कार्यक्रमात बोलतांना प्रमुख पाहुण्यांनी वन्यजीव संरक्षणाच्या महत्त्वावर भर दिला आणि एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अभिनंदन केले. डॉ. उपाध्ये यांनी केंद्राच्या सुरुवातीपासून नागपूरला मिळालेल्या कामगिरीची गणना केली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सहभागींना प्रशिक्षणाबाबत डॉ. व्ही. एम. धूत, डॉ. बी. के. भदाणे, डॉ. ए. एस. शालिनी, डॉ. मयूर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगथ यांचे कडून प्रथम माहिती आणि वन्यप्राण्यांमध्ये रासायनिक स्थिरीकरण या विषयावरील प्रशिक्षण मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजित कोलंगथ यांनी केले. तसेच श्री. चंद्रशेखरन बाला एन., सीईओ, एफडीसीएम गोरेवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड आणि श्री. शतानिक भागवत, विभागीय व्यवस्थापक, प्रकल्प, नागपूर यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here