✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 9 डिसेंबर) तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी येथे शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी श्रीमती वंदना प्रेम पडवळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनदाभी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात होती.
आणि त्यात पालकाची नेमणूक करण्यात आली तर श्रीमती वंदना प्रेम पडवळे अध्यक्षपदी उपाध्यक्ष माधव दरुसिंग ब्ररदावळ उपाध्यक्ष एक ते सात वर्गाचे एक पालक अविरोध निवड करण्यात आली.
त्यामध्ये शिक्षण तज्ञ म्हणून देवानंद साहेबराव वाडेकर यांची निवड व ग्राम पंचायत सदस्य म्हणून मारुती बाळूजी लुटे, शिक्षक वृंद सचिवपदी एम.पी गायकवाड यांची शाळा व्यवस्थापन समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली.
ग्रा. पं. उपसरपंच मारोती पिलवड, युवराज साबळे, अशोक घोगेवाड, जव्हार पडवळे इत्यादी ग्रामस्य व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळा व्यवस्थापन समिती अविरोध गठीत करण्यात आली.
सूत्रसंचालन दारुडे सर व आभार प्रदर्शन देवानंद वाडेकर यांनी केली.